सुटीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्रे

नाशिक (प्रतिनिधी): वीजग्राहकांना आता सुटीच्या दिवशीही बिल भरता येणार आहे. महावितरणकडून बिल वसुलीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने जिल्ह्यातील वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीदेखील सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी याबाबत दिलेल्या आदेशानुसार केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. शनिवार आणि रविवारीदेखील वीजबिल भरणा केंद्रे सुरु राहणार आहेत.