सीताबाई मिसळच्या संचालिका सीताबाई मोरे यांचे निधन

सीताबाई मिसळच्या संचालिका सीताबाई मोरे यांचे निधन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अश्या मिसळ पैकी एक म्हणून सीताबाईची मिसळ ! या मिसळच्या संचालिका सीताबाई मोरे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या.

नाशिकच्या मिसळची संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. नाशिकच्या सुप्रसिद्ध मिसळ पैकी जुने नाशिक भागातील सीताबाईची मिसळचा आस्वाद घेण्यासाठी दररोज दुरदुरून खवव्ये येत असतात. ७५ वर्षांपूर्वी सीताबाई मोरे यांनी या मिसळ ची सुरुवात केली होती. त्या स्वतःच आपला हा मिसळचा व्यवसाय सांभाळत. मिसळसाठी लागणारे बहुतांश पदार्थ त्या स्वतःच घरी बनवत. दररोज मिसळ खाण्यासाठी शेकडो खवय्ये हे या ठिकाणी येत असत.

सीताबाई मोरे या शेवटच्या श्वासापर्यंत एकट्याच मिसळ चालवायच्या. ना कोणता स्टाफ, ना कोणता कारागीर,  ना हेल्पर. नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अशा या प्रसिद्ध महिला व्यावसायिक ज्यांनी मिसळीच्या माध्यमातून स्वतःसोबतच नाशिकचे देखील नाव उंचावर नेऊन ठेवले अश्या सीताबाई मोरे यांना नाशिक कॉलिंगकडून भावपूर्ण श्रद्धांजली..