सिडको विभागीय कार्यालयात अधिकारीच अनुपस्थित; आयुक्त कारवाई करणार का ?

सिडको विभागीय कार्यालयात अधिकारीच अनुपस्थित; आयुक्त कारवाई करणार का ?

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकच्या मनपा सिडको विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागात अधिकारी आणि कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या बांधकाम विभागात अधिकारी कर्मचारी आहे की नाही असच काहीसं चित्र अनेक वेळा आणि आजसुद्धा पाहायला मिळाले.

मनपा नवीन नाशिक विभागीय कार्यालय येथे बांधकाम विभागात दुपारी दोन नंतर चक्क शुकशुकाट पाहायला मिळाला. या विभागाचे उपअभियंता एजाज काजी यांच्यासह सर्वच कर्मचारी दुपारनंतर कार्यालयात गैरहजर असल्याचे दिसून आले, त्यामुळे या विभागात येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कार्यालयाचे प्रमुख उपअभियंताच त्याठिकाणी नसल्याने कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे फिरावे लागते आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजे नंतरही सिडको मनपाच्या बांधकाम विभागात एक शिपाई कर्मचारी सोडून सर्वच कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले होते..

गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सतत सुरू असल्याने नेमक बांधकाम विभागाचे कर्मचारी अभियंता करतात तरी काय? यांच्या कार्यालय कामकाजाची वेळ सरकारी की स्वतः ठरवलेली असा प्रश्न आता नागरिक करत आहेत. या विभागातील शुकशुकाटामुळे आता नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अशा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनपा आयुक्त यावर कारवाई करणार का असा सवाल नागरिक करत आहेत !