सिडकोतील तरुणाचा गॅस गिझरच्या स्फोटात मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सिडको भागातील दौलतनगर परिसरात गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एक तरुण गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि.१) दुपारच्या सुमारास घडली. याबाबत अंबड पोलीसठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिडकोतील रहिवासी गौरव समाधान पाटील (वय.२७) हा स्नानगृहात अंघोळ करीत असताना गिझरचा स्फोट झाल्याची घटना घडली. अचानक स्फोट झाल्याने घरच्यांसोबत परिसरातील नागरिकांना देखील मोठा धक्का बसला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या गौरवला घरातील मंडळी व परिसरातील लोकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, स्फोट मोठा असल्याने गौरवाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केले