सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक कोंडीने उडाला गोंधळ !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर परिसरातील वडाळा-पाथर्डी व वडाळा-राजीवनगर रस्त्यावर नवीन सिग्नल बसवण्यात आले आहे. मात्र, या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

रविवारी (दि.२० डिसेंबर) रोजी सांयकाळी या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली होती. दरम्यान सिग्नलवर वाहतूक पोलीसच नसल्याने परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदर सिग्नलवर वाहतूक पोलीसच तैनात नसल्याने वाहनचालक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये नेहमीच भीती असते. म्हणून, नागरिकांकडून या सिग्नलवर नेहमी वाहतूक पोलीस तैनात असावे अशी मागणी करण्यात येत आहे.