सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटी परिसरात बुधवारी (दि.२१) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रिया गायकवाड असं मयत महिलेचं नाव आहे.

लग्न झाल्याच्या सहा महिन्यांनंतर प्रियाचा पती कुणाल गायकवाड हा फुलांचा व्यवसाय करण्यासाठी वेळोवेळी पैश्यांची मागणी करायचा. तसेच शिवीगाळ करून रोज मारहाण करायचा. त्यासोबतच सासू-सासरे, नणंद आणि दीरसुद्धा प्रियाला लग्नात पाहुणचार आणि मानपान केला नाही शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून प्रियाने अखेर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. याविरोधात मयत महिलेच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्यात तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा नोंदवला आहे.