साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांचा अपघात: एकाचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमी

साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांचा अपघात: एकाचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यावर शुक्रवारी (15 जुलै) दुपारच्या सुमारास दोन पर्यटकांचा पाय घसरून अपघात झाला आहे.

यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

अधिक माहिती अशी की, मालेगाव  येथील १२ तरुणांचा एक गट पर्यटनासाठी साल्हेर किल्ल्यावर आला होता.

चढण्यासाठी अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर किल्ल्यावर या गटाने ट्रेकिंग करण्याचा निर्णय घेतला.

साल्हेर वाडीकडून उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली. या चढाईत अवघड अश्या 65 पाहिऱ्या आहेत. याठिकाणी चढाई करत असताना भावेश शेखर अहिरे (वय २१) आणि  मनिष सुनील मुठेकर (वय २१) या दोघांचे पाय घसरून खाली दरीत पडले. यात भावेश अहिरे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर मनिष  मुठेकर याचा पाय फॅक्चर झाला आहे.

घटनेची माहिती काळविल्यानंतर घटनास्थळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांनी दाखल झाले. मलेगावाचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचविण्यासाठी मालेगावहून साल्हेर किल्ल्याजवळ आले.त्यांनीही चढाईकरून जखमीला आपल्या पाठीवर बसवून थेट खाली उतरले. तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.