सार्वजनिक ठिकाणी केला वाढदिवस साजरा.. पोलिसांनी केली अटक !

नाशिक (प्रतिनिधी): पोलिसांची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याने आयोजाकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आशिष दिरोदिया यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

आशिष फिरोदिया यांचे वाढदिवसानिमित्त दिनांक ११/११/२०२० रोजीचे सायंकाळी १८:०० वाजेचे सुमारास नारी हर्ष फाउंडेशन कार्यालयाचे समोर, संजय राका चौक, सिंहस्थनगर, सिडको नाशिक या ठिकाणी स्वत:चे वाढदिवसाचे कार्यक्रमांचे आयोजन करून राजकीय लोकांना कार्यक्रमांस बोलाविलेले होते. सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आशिष फिरोदिया यांनी पोलीस विभागाची रितसर लेखी परवानगी न घेता, बॅनर, टेबल, खुर्च्या लावुन एकत्रित जमुन, तसेच कार्यक्रमांकस जमलेल्या गर्दीमुळे सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणु या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे परिणामांकडे दुर्लक्ष करून हयगयीची कृती करून स्वत:चे व सामान्य लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशी कृती केली. त्यामुळे सदरची बाब पोलीसांचे निदर्शनास येताच अंबड पोलीस ठाणेत त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन अंबड पोलीसांनी आशिष फिरोदिया यास अटक करुन कारवाई केली आहे. अशाप्रकारे विनापरवानगी वाढदिवस व अन्य कार्यक्रम घडवुन आणणाऱ्या आयोजकांवर यापूढे गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.