सातपूरला वाहनाच्या धडकेने १६ वर्षीय सायकलस्वार मुलाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात रोज अपघात होण्याच्या घटना घडतच आहेत. औद्योगिक वसाहतीत एका अल्पवयीन मुलाच्या अपघाताची घटना घडली. तो आपल्या सायकलवरून जात असताना त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाचे नाव निखिल अनिल पाटील असून तो १६ वर्षांचा होता.

निखिल हा १८ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास सायकलवरून औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावरून जात होता. तेवढ्यात मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने त्याच्या सायकलला मागून येऊन धडक दिली. धडक दिल्याने तो खाली रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे  त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या रोजच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा व वाढत्या वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.