नाशिक (प्रतिनिधी) : सराफ बाजारात तब्बल २० लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास घडला होता. त्यानंतर याप्रकरणाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी सराफ बाजारातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन संशायीत या व्यापाऱ्याच्या दुचाकीचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. हे संशयित परराज्यातील असण्याची संभाव्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सराफ बाजारातील चोरीचे पोलिसांच्या हाती लागले धागेदोरे…
2 years ago