सराईत गुन्हेगाराची हत्या…

नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली गावात राहणाऱ्या सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे (वय ४५) याची हत्या झाल्याची माहिती आहे.

संजय धामणे हे काल (दि.१८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास इगतपुरी येथे असलेल्या घरी जात असतांना टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शास्त्राने वार केल्यामुळे तो जागीच ठार झाला. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.