सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कडक कारवाई ; आठ सराईत गुन्हेगार तडीपार

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात रोज वाढती गुन्हेगारी बघता पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस आता सराईत गुन्हेगारांच्या शोधात आहे. या कार्वैमध्ये एकूण ८ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

नाशिकरोड येथील हुसेन फिरोज शेख (वय १८, रा. रेल्वे कॉलनी, सिन्नरफाटा), गणेश मधुकर वाघमारे (वय १९, रा.गायकवाड मळा), उपनगर येथील पराग राजेंद्र गायधनी (वय २७, रा. नाशिक रोड), अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सतीश बबन माने (वय २३, रा. मुली चौक, अंबड), राजू कचरू अढगळे (वय ३१, रा. गांधी वसाहत, लेखा नगर), शिवाजी चौक शनी मंदिर येथील अजय संजय आठवले (२५) आणि अक्षय संजय आठवले (२१), सातपूर येथील अजय महादू मोरे (वय २६, रा. अशोकनगर) अशा आठ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.