संपत सकाळे यांनी दिला सभापती पदाचा राजीनामा…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. गेल्या पाच महिन्यांपासून संपत सकाळे हा पदभार सांभाळत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये रोटेशन पद्धतीने पदभार सांभाळावा यावर चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे इतर संचालकांना सुद्धा सभापती पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वांच्या सहमतीने संपत सकाळे यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर सभापती पदाचा पदभार जिल्हा उपनिबंधक यांना सुपूर्द करण्यात आला आहे.