शहरात सीएनजी स्टेशनचे काम सुरु!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात बससेवा सुरु करताना सीएनजी इंधन पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या एक्सप्लोसिव्ह विभागाचा ना हरकत दाखल मिळाला आहे. सिन्नर फाटा व पंचवटी विभागातील फायर स्टेशनच्या जागेत सीएनजी स्टेशन उभारण्याचे काम महापालिकेने चालू केले आहे. दिवाळी पर्यंत काम पूर्ण होऊन बससेवेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

ही बससेवा सुरु करण्याचं निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्वावर खाजगी कारणातून बस सेवा चालवली जाणार असून त्यासाठी ऑपरेटर देखील नियुक्त केले आहेत. पहिल्या टप्यात ५० डिजेल बस आणि २०० सीएनजी बस चालवल्या जाणार आहेत. तसेच ५० इलेक्ट्रिकल बस चालवण्याचे नियोजन सरकारी योजनेतून आहे. महराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी सोबत करार करण्यात आला आहे.पंधरा वर्षासाठी विल्होळी येथे सीएनजी केंद्रासाठी जागा दिली जाणार आहे.