शहरात आज राम मंदिर भूमिपुजानानिमित्त विविध कार्यक्रम रंगले…

नाशिक (प्रतिनिधी) : अयोध्येमध्ये आज (दि.०५) राम मंदिराचा भूमिपुजन कार्यक्रम होता. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये विविध भागात अनेक कार्यक्रम झाले. प्रभू श्रीरामचंद्रांची तपोभूमी म्हणून नाशिकला ओळखले जाते. त्यामुळे राम मंदिर भूमिपुजानानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शहरात आज दीप प्रज्वलन, सामुहिक रामरक्षा पठण, घंटानाद इत्यादी कार्यक्रम पार पडले. पंचवटीतील काळाराम मंदिरात पूजेसह राम भजन पार पडले. रामकुंडावर सकाळी पूजन सोहळा आणि गंगाआरती करण्यात आली. संध्याकाळी जुना आडगाव नका येथे असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात मंत्रपठण करण्यात आले.