शहरातील हे पाच सराईत गुन्हेगार तडीपार!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. आणि या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने अनेक कारवाईच्या मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत पोलीस आयुक्तालय परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील पाच गुन्हेगाराना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये भद्रकाली, गंगापूर, सरकारवाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दींचा समावेश करण्यात आला आहे.

पाच तडीपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये कल्पेश उर्फ सोन्या मानिज झगडे (वय २२, रा. भंडारीबाबा चौक, जुने नाशिक), धनंजय शिवाजी मिसाळ (वय २९, रा. बजरंगनगर, आनंदवली, गंगापूर रोड), हेमंत राजेंद्र भदाणे (वय ३०, रा. शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, गंगापूर) यांना प्रत्येकी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. तसेच अवधूत सुनील जाधव (वय १९, रा. दत्तमंदिर, शिवशक्ती चौक, सिडको) याला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.  

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू