शहरातील वाहतूक पोलिसाचा कोरोनाने बळी…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहर वाहतूक शाखा युनिट-२ मधील एका कर्मचाऱ्याचा रविवारी (दि.०४) मृत्यू झाला. निवृत्ती निंब जाधव (वय ५२) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाहतूक पोलिसाचा हा पहिला बळी गेल्याची घटना घडल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलीस कर्मचारी निवृत्ती जाधव यांना २६ सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना पंचवटी परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच रविवारी (दि.०४) त्यांची प्राणज्योत मालवली.