शनिवारी सिडको व नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा राहणार बंद !

नाशिक (प्रतिनिधी) : मुकणे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या कामानिमित्त महावितरणच्या सबस्टेशनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि.२ जानेवारी) रोजी नाशिक पूर्व व सिडको भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यानुसार, मुकणे जलवाहिनीचे काही विद्युत कामकाज शनिवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुकणे धरणातून पाणीपुरवठा करता येणार नाही. म्हणून, सिडकोमधील प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २२ मध्ये भागश: तर २७, २८, २९, ३० मध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच नाशिक पूर्व विभागातील प्रभाग १४, १५, २३ व ३० मध्ये देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, रविवारी संबंधित ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.