शनिवारी नाशिक शहरात पाणीपुरवठा नाही!

नाशिक (प्रतिनिधी) : मनपाचे मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत कामे करण्यासाठी विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथुन होणारा शनिवारी (दि.२८) सकाळचा आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही.

तसेच गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास रॉवॉटर पुरवठा करणारी वाहिनी मोठया प्रमाणावर लिकेज झालेली असून पाण्याची गळती होत आहे. त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

मनपाचे गंगापुर धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपींग स्टेशन व चेहेडी पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवारी सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवारी (दि.२९) नाशिक रोड वगळता सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नाशिकरोड परिसरात रविवारी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.