वेळीच गुन्हा दाखल केल्याने ऑनलाईन फ्रॉड टळला…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये राहणाऱ्या सोपान गोटीराम एंडाइत (७३) यांच्या क्रेडीट कार्ड च्या खात्यातून चोरांनी ऑनलाईन पद्धतीने १ लाख रुपये काढून घेतले. मात्र वेळीच सायबर पोलिसांकडे  तक्रार केल्याने त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले.

गेल्या ४ डिसेंबरच्या संध्याकाळी सोपान एंडाइत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत पैशांचे सर्व व्यवहार फ्रीझ केले. त्यामुळे सोपान एंडाइत यांच्यासोबतच इतरांची फसवणूक झालेले ८० हजार रुपये सुद्धा सायबर पोलिसांनी गोठले. दरम्यान चोरट्यांनी ऑनलाईन पद्धतीने फ्रॉड करून घेतलेले पैसे परत मिळाल्याने तक्रारदारांनी त्यांचे आभार मानले.