विवाहितेस फोटो व्हायरलची धमकी देत मागितली ९ लाखांची खंडणी

नाशिक (प्रतिनिधी): विवाहितेच्या जुन्या मैत्रीचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी ९ लाखांची खंडणी मागीतल्याची तक्रार पीडितेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी संशयित अमोल अनिल माळी (रा. पाथर्डी फाटा, मूळ रा. यावली, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडितेच्या तक्रारीनुसार संशयिताने मैत्रीचा फायदा घेत साेशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करत त्यावर पीडितेचे फोटो अपलोड केले. संशयिताने त्याच्याकडील जुने फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी केली. संशयित माळीने हे प्रकरण थांबवण्यासाठी ९ लाखांची खंडणी मागितली. अशी तक्रार पोलिसांना दिली.