नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेमिनारला अनेक डॉक्टर्स विना मास्क उपस्थित होते. यावेळी तिथे आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पथकाने सर्व डॉक्टर्सला २०० रुपयांचा दंड केला. त्यामुळे आता हि कारवाई वेग धरेल असच चित्र दिसतंय.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासन आक्रमक होताना दिसून येत आहे. नाशिक शहरातील एका हॉटेलमध्ये येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये मास्क न घातलेल्या डॉक्टरांवर महापालिकेच्या पथकाने कार्यवाई केली आहे. या कार्यवाईमुळे महापालिकेने घालून दिलेले नियम डॉक्टरच पाळत नसल्याचे दिसून येत आहे. एकूणच कोरोनाबाबत घालून दिलेले नियम न पाळणाऱ्यांवर कडक कार्यवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.