नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीची छेड काढून जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी पंचवटीतील पेठरोड भागत राहणाऱ्या संशयित राहुल दौलत बोडके याला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व ४००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
१२ एप्रिल २०१८ रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गडली हाेती. याप्रकरणी पीडितेने पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपी राहुलविरोधात तक्रार दिली होती. तत्कालीन उपनिरीक्षक एच. एन. देवरे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. राहुलविरोधात गुन्हा शाबित झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.