विडी दिली नाही म्हणून…काय केले बघा

नाशिक (प्रतिनिधी) : विडी दिली नाही म्हणून, एका संशयिताने एका इसमास जुने सीबीएस परिसरात मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. मारहाणी दरम्यान ५२ वर्षीय इसम गंभीर जखमी असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी नाना देवमन अहिरे (वय ५२, रा. गांधीचौक कळवण, जि.नाशिक) हे नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. २१ डिसेंबर) रोजी जुने सीबीएस येथे बसले होते.. दरम्यान, त्यांच्या परिचयातील अत्तार शेख याने अहिरे यांच्याकडून विडी मागितली. मात्र, अहिरे यांनी त्यास विडी दिली नाही म्हणून, याचा राग येऊन, शेख याने शिवीगाळ केली. तसेच हातात असलेल्या लाकडी काठीने अहिरे यांना मारहाण केली. दरम्यान, अहिरे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या पायाला मार लागला आहे.