वायफायचं काम करत असताना हायटेन्शन विद्युत तारांचा स्फोट; युवक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): वायफाय कनेक्शनचे काम करत असताना हायटेन्शन विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने एक युवक भाजल्याची घटना समोर आली आहे. जखमी युवकाला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाथर्डी फाटा येथील प्रणव हाईट्स या अपार्टमेंट मध्ये वायफाय कनेक्शनचे काम करत असताना काम करणारा युवक हा येथून जाणाऱ्या विद्युत तारांच्या संपर्कात आला, त्यामुळे मोठा स्फोट होऊन यात वायफायचं काम करणारा सौरभ भुसारे नामक युवक हा 30 ते 40 टक्के भाजल्याचे समोर आले आहे. युवकाला स्थानिक नागरिकांनी तातडीने पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे इमारतीच्या भिंतींना तडे गेल्याचे दिसून आलेय.

अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेला युवक हा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेण्याच्या तयारीत होता, मात्र तात्काळ जागेवर स्थानिक नागरिक पोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ह्या घटनेमुळे अपार्टमेंटमधील नागरिकांच्या घरातील फॅन, टीव्ही ,लाईट बोर्ड , आदी विद्युत उपकरणे जळून खाक झाले आहेत..