वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित ; काय म्हणाले संजय राऊत

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नाशिकच्या भाजप पक्षातील वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेचे खासदार संजय राउत यांच्या उपस्थितीत आज सकाळी शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी खासदार संजय राउत म्हणले, नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांवर असणार आहे. शिवसेनेचा हा कुठलाच मास्टर प्लान नाहीये. प्रवाह बदलतोय तशीच हवा सुद्धा बदलतेय असे म्हणत संजय राउत यांनी भाजपवर निष्ण साधला.