वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून टोळक्याने केली युवकास मारहाण…

नाशिक (प्रतिनिधी): वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून टोळक्याने युवकाला मारहाण केल्याची घटना जय भवानी रोड येथे घडली आहे. याबाबत स्वाती विजय कालापाड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या भावाला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली.

स्वाती कालापाड ह्या जय भवानी रोड येथील केजे मेहता शाळेजवळ राहतात. २२ जुलै रोजी सुनील दादाजी मासराम, विष्णू मेटके, रवी खरात ही मंडळी कालापाड यांच्याकडे गेली आणि ५०० रुपये वर्गणीची मागणी केली. यावर वर्गणी देण्यास कालापाड यांनी नकार दिला. याचा संशयित आरोपींना राग आला. हा राग मनात धरून त्यांनी कालापाड यांचा भाऊ प्रशांत संजय लोखंडे यास रस्त्यात अडविले आणि जबरदस्ती वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रशांतला शिवीगाळ व मारहाण केली आणि “पैसे द्यावेच लागतील नाही तर बघून घेऊ” अशी धमकीही दिली. त्यामुळे स्वाती कालापाड यांनी याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता खंडणीचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या