वडाळागावात किरणा दुकानाला आग; तेलाचे डबे व वस्तू जाळून खाक

नाशिक (प्रतिनिधी): वडाळागाव येथील मोहम्मद अली रोड पूजा सुपर मार्केट या किराणा दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी आग लागल्याच माहिती अग्निशन दलास दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी अवघ्या काही वेळातच पोहोचले आणि शर्तीचे प्रयत्न करून अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले….

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास प्रकाश बजरंग चौधरी यांच्या मालकीचे पूजा सुपर मार्केट या किराणा दुकानाला आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आगीवर पाणी मारून आग नियंत्रणात आणली.

या आगीत किराणामाल विविध वस्तू तेलाचे डबे इलेक्ट्रिक वायरिंग जळून भस्म झाले आहेत अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येतेय. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.दुकानात शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून. मात्र  नेमकं ही आग लागली कशी याच कुठलही कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही…