नाशिक (प्रतिनिधी) : शहरात तरुणाईचे आत्महत्येचे सत्र सुरु असून, गेल्या ३-४ दिवसांपूर्वीच २ तरुण मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर परत एका तरुण युवकाने वडनेर दुमाला परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चेतन संजय सावंत (रा.राजवाडा बुद्धविहारजवळ, वडनेर दुमाला) याने गुरुवारी (दि.३१ डिसेंबर) रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. दरम्यान, चेतनने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. यांनतर, चेतनला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. चेतनच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजून आले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.