वजन वाढवण्यासाठी घंटागाडीमध्ये दगड आणि माती!

नाशिक (प्रतिनिधी) : संपूर्ण शहरातून घनकचरा संकलित केल्यानंतर घंटागाडीचे वजन होते. त्या वजनानुसार ठेकेदाराला महापालिकेकडून निधी दिला जातो. मात्र घंटागाडीत माती आणि दगड भरून घंटागाडीचे वजन वाढवण्याची आयडिया करून पैसे उकळण्याचा धंदा महापालिकेसमोर आला आहे.

नाशिकरोड परिसरातील तनिष्क सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपनीच्या दोन घंटागाड्यामध्ये माती आणि दगड असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी केलेल्या पाहणीतून उघडकीस आले. त्यामुळे आयुक्तांनी या कंत्राटदरांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.