लोकमान्य सोसायटी नाशिक विभागीय कार्यालयाचा आज शुभारंभ

लोकमान्य सोसायटी नाशिक विभागीय कार्यालयाचा आज शुभारंभ

नाशिक (प्रतिनिधी): लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी च्या नाशिक मधील विभागीय कार्यालयाचा उदघाटन सोहळा दिनांक १६ जुलै २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री नाशिक जिल्हा पालक मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ह्यांच्या हस्ते व खासदार हेमंत गोडसे, आमदार सौ. सरोज अहिरे व महापौर सतीश कुलकर्णी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत  उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे, स्टार झोन मॉल (पासपोर्ट ऑफिस) जवळ  नाशिक पुणे हाय वे रोड डावखरवाडी येथे  नवीन भव्य आणि प्रशस्त वास्तूमध्ये नूतन विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे .

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

१९९५ साली कर्नाटकातील बेळगाव शहरात लोकमान्य सोसायटी ची पहिली शाखा चालू झाली व आता २१३ शाखाचे विस्तीर्ण जाळे महाराष्ट्र, गोवा, राजधानी दिल्ली व कर्नाटकात पसरले आहे , लोकमान्य सोसायटी च्या सर्व शाखा आधुनिक सोयी व सुविधांनी सुसज्ज अशा असून  ग्राहकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत असतात . लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी च्या नाशिक विभागाची स्थापना २०१४ साली झाली , गेल्या ७ वर्षात नाशिक विभागाने चांगली कामगिरी केली असून, सर्व कर्मचारी  ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देत आहेत.

नाशिक विभाग हा लोकमान्य सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील महत्वाचा विभाग आहे. नाशिक विभागात सिडको , इंदिरानगर ,सावरकर नगर , जळगाव व नाशिक रोड शाखांचा समावेश आहे . नजीकच्या काळात नाशिक रोड येथे सुसज्ज अशा लॉकर्स ची सुविधा पण सुरु होणार आहे .आजवर अनेक मान्यवरांनी लोकमान्य सोसायटी च्या विविध उपक्रमात व उदघाटन समारंभात उपस्थिती दर्शवून  लोकमान्य सोसायटीच्या कार्याची पावती दिली आहे . ह्या पूर्वी हि २०१३ साली श्री भुजबळ साहेब महसूल मंत्री असताना लोकमान्यच्या ३ शाखांचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले आहे  व सर्व शाखा उत्तमरीत्या कार्यान्वित आहेत .

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू

स्थापनेपासून लोकमान्य सोसायटी ने नाशिक विभागीय क्षेत्रात भरपूर सामाजिक कार्य केले असून विविध सामाजिक संस्थांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या  आधार आश्रमासाठी संस्थापक अध्यक्ष  श्री किरण ठाकूर ह्यांच्या वाढदिवशी जीवनोपयोगी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, लोकमान्य सोसायटीने श्री खांडबहाले याना मिनी स्कूल बस  भेट दिली आहे, तसेच कुंभमेळा  सोहळ्यात  पोलीस कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय केलीहोती ,तसेच साईबाबा वाचनालयास टेबले व खुर्च्या  भेट म्हणून दिल्या आहेत. नाशिक विभागातर्फे दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात . तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून नवीन पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू