लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या पाच दुकानांवर कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर पंचवटी पोलिस आणि महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. यावेळी दुकानदारांकडून एकूण २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे..

नाशिक शहरातील काही परिसरात दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्तही काही दुकानदार शटर अर्धे उघडे ठेवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पोलीस आणि महापालिकेने कारवाईसाठी कंबर कसली आहे.

शासन नियमांच्या वेळेत दुकाने बंद न केल्याने कारवाई केली. अत्यावश्यक सेवेमधील किराणा आणि खाद्यपदार्थ, भाजीपाला, दूध विक्री आणि शेतीपयोगी औषध विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी सात ते अकरा या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याचे पथक गस्त करत असताना शटर अर्धवट उघडे ठेवत दुकान सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले. जयभवानी सीड्स, ललवाणी कृषी एजन्सी, अभिषेक शेती उद्योग भंडार, ओमकार एग्रोटेक, महावीर ट्रेडर्स या दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार दंड करण्यात आला.