लेखापरीक्षकांनी वाचवले नाशिककरांचे एक कोटी रुपये….

नाशिक (प्रतिनिधी) : खाजगी रुग्णालयांच्या अतिरिक्त बिले आकारणीच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने लेखापरीक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. तत्कालीन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १३२ लेखापरीक्षक नियुक्त केले होते.

रुग्णालयातील एकूण बेड्सच्या ८० टक्के बेड्स साठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार खासगी रुग्णालयांकडून बिल आकारले जात आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी या लेखापरीक्षकांवर होती. या लेखापरीक्षकांच्या परीक्षणामुळे एक ते दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल एक कोटींहून अधिक रकमेची तफावत आढळून आली. म्हणून रुग्णालयांकडून आकारण्यात आलेली जादा बिले तपासून अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत करण्यास सांगितली गेली. त्यामुळे सामान्य जनतेचे एक कोटी रुपये या लेखापरीक्षकांनी वाचवले असेच आपल्याला म्हणता येईल.