लाल कांदा ४ हजारावर, किरकोळ बाजारातही ४० रुपये किलो

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सध्या लासलगाव, पिंपळगाव, उमराणा, मालेगाव, कळवण, चांदवड बाजार समित्यांमध्ये आवक कमी होत असून दरात वाढ झाली आहे. गुरुवारी (दि. ११) लाल कांदा ३ हजार ५०० रुपये तर कमाल ४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला. सरासरी दर ३ हजार ७०० रुपये होता. किरकोळ बाजारातही दर ४० ते ५० रुपये किलोवर गेले होते.