लक्षणीय : नाशिक विभागात 40 लाख 26 हजार 417 क्विंटल कापसाची खरेदी!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनामार्फत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी 1 लाख 3 हजार 637 शेतकऱ्यांकडून 31 लाख 42 हजार 284 क्विंटल तर कोविड कालावधीनंतर 33 हजार 708 शेतकऱ्यांकडून 8 लाख 84 हजार 132 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याप्रमाणे विभागात एकूण 1 लाख 37 हजार 345 शेतकऱ्यांकडून एकूण 40 लाख 26 हजार 417 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

नाशिक विभागात आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात 25 लाख 55 हजार 655 क्विंटल इतकी सर्वाधिक कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 5 लाख 09 हजार 734 क्विंटल, धुळे जिल्ह्यात 4 लाख 50 हजार 23 क्विंटल, नंदूरबार जिल्ह्यात 4 लाख 44 हजार 410 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात 66 हजार 593 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही विभागीय सहनिबंध लाठकर यांनी सांगितले. 

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी 1 हजार 221 शेतकऱ्यांचा 39 हजार 630 क्विंटल तर कोविड कालावधीनंतर 712 शेतकऱ्यांचा 26 हजार 963 क्विंटल अशा एकूण 1 हजार 933 शेतकऱ्यांचा 66 हजार 594 क्विंटल कापूस पणन महासंघामार्फत खरेदी करण्यात आला आहे. कापूस पणन महासंघ, सी.सी.आय, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक तसेच बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापारी यांचेमार्फत कापूस खरेदी करण्यात येत असते. यानुसार नाशिक विभागात कापूस पणन महासंघामार्फत आजपर्यंत विभागात 41 हजार 25 शेतकऱ्यांकडून 13 लाख 10 हजार 471 क्विंटल, सीसीआयकडून 67 हजार 584 शेतकऱ्यांचा 17 लाख 53 हजार 28 क्विंटल, खाजगी बाजाराच्या माध्यमातून 18 हजार 586 शेतकऱ्यांकडून 7 लाख 12 हजार 862 क्विंटल तर बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यांमार्फत 10 हजार 150 शेतकऱ्यांकडून 2 लाख 50 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

लक्षणीय :

शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनामार्फत विभागतील पाचही जिल्ह्यांमध्ये कापूस खरेदी सुरू

विभागात एकूण 1 लाख 37 हजार 345 शेतकऱ्यांकडून एकूण 40 लाख 26 हजार 417 क्विंटल कापूस खरेदी.

जळगांव जिल्ह्यात विभागातील सर्वाधिक 25 लाख 55 हजार 655 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे.

विभागात कापूस पणन महासंघामार्फत आजपर्यंत 41 हजार 25 शेतकऱ्यांकडून 13 लाख 10 हजार 471 क्विंटल.

सीसीआयच्या माध्यमातून विभागात 67 हजार 584 शेतकऱ्यांचा 17 लाख 53 हजार 28 क्विंटल कापसाची खरेदी.