रॉबिनहूड आर्मी व्हॅलेंटाइन डे ‘रोटी डे’ म्हणून साजरा करणार !

नाशिक (प्रतिनिधी): रॉबिनहूड आर्मी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १४) व्हॅलेंटाइन डे हा ‘रोटी डे’ म्हणून साजरा होईल. या दिवशी गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी बटाट्याची सुकी भाजी व चपाती असलेले पार्सल द्यावे. ते गरजवंतांना दिले जाईल. उपक्रमात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३७३९०००४८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.