राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नाशिक दौऱ्यावर…

नाशिक (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मंगळवारी (दि.03) नाशिक दौऱ्यावर येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार  राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्यात कार्यक्रमांचे नियोजन पुढील प्रमाणे आहे.

राजभवन, मुंबई येथून शासकीय हेलिकॉप्टरने नाशिककडे सकाळी ९.३० वाजता प्रयाण.

हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, नाशिक येथे      सकाळी १०.१५ वाजता आगमन व राखीव.हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, मानोरी येथून वाहनाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सकाळी १०.२० वाजता प्रयाण. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हसरुळ, नाशिक येथे सकाळी१०.२५ आगमन व राखीव.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नुतनीकरण केलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उदघाटन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छतावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलचा उद्घाटन कार्यक्रमास सकाळी ११.०० ते दु. १२.००  वाजता उपस्थिती.

भोजन व राखीव      दुपारी.१२.०० ते ३.०० वाजेपर्यंत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हसरुळ, नाशिक येथून दुपारी. ३.०० वाजता वाहनाने हेलिपॅडकडे प्रयाण. 

हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, नाशिक येथे दुपारी. ३.०५  वाजता आगमन व राखीव.   

हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, मानोरी येथून शासकीय हेलिकॉप्टरने  दुपारी. ३.१० वाजता राजभवन, मुंबईकडे प्रयाण.     

राजभवन, मुंबईकडे दुपारी ३.५५ वाजता आगमन      .