रस्ता ओलांडत असतांना चहा विक्रेत्याचा जागीच मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील देवळाली कॅम्प भागात वाहनाच्या धडकेत चहाविक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सायमन आरोग्य स्वामी (४५) असे मृत व्याक्रीचे नाव आहे.

स्वामी हे बुधवारी (दि.०४) संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास ग्राहकांना चहा देण्यासाठी गेले होते. चहा देऊन परतत असतांना रेस्ट काम रोडवरील रेणुकादेवी मंदिराच्या परिसरात रस्ता ओलांडत असताना भगूरकडून देवळाली कॅम्प च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत सायमन स्वामी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा भाऊ लॉरेन्स स्वामी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी (दि.०५) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.