रजिस्टर पोस्टाद्वारे तलाक दिला म्हणून गुन्हा….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या मालेगाव भागात रजिस्टर पोस्टाने तलाक दिल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पती आबीद, सासू-सासरे, नणंद-नांदी, दीर यांनी हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ती मागणी विवाहितेने पूर्ण केली नाही म्हणून तिला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर रजिस्टर पोस्टाने ‘तीन तलाक’ असा मजकूर लिहून रजिस्टर पोस्टाने पाठून तलाक दिला. त्यामुळे महिलेने पती आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.