‘युवा मित्र’चे संस्थापक सुनील पोटे यांचे निधन…

नाशिक (प्रतिनिधी): ‘युवा मित्र’चे संस्थापक आणि जलमित्र म्हणून ओळख असणारे सुनील हरिभाऊ पोटे यांचे वयाच्या ४९व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. आठ दिवसापासून नाशिक मधील खाजगी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सिन्नर तालुक्यात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली असून थोरल्या-लहानांपर्यंत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, आणि मुलगी असा परिवार होता.

सुनील पोटे यांनी १९९५ मध्ये ‘युवा मित्र’ची स्थापना केली होती. तसेच देवनदीचे पुनरुज्जीवन करून जलसंधारणाचे काम, ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती तालुक्यातील तलाव,  बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची जल चळवळ यासह जलसंसाधन विकास शेती, विकास आणि उपजीविका, संस्था आणि कौशल्य विकास, आरोग्य याव  अनेक राज्यांमध्ये काम केले त्याच प्रकारे अडीच हजार महिलांना एकत्र करून आशिया खंडातील पहिली शेळी उत्पादक कंपनी त्यांनी स्थापन केली. यासारख्या अनेक कामात त्यांचा मोठा वाटा आहे.