यंदा प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराला बंदी; आदेश मोडल्यास…..

नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. १५ ऑगस्ट जवळ येत असल्याने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्राध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास परवानगी दिलेली नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नाशिक शहर क्षेत्रात १० ऑगस्ट पासून ते २४ ऑगस्ट पर्यंत प्लास्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळेस किवा विशेष क्रीडा कार्याक्रमाप्रसंगी प्लास्टिकचे राष्ट्रध्वजांचा वापर केला जातो. त्यानंतर ते रस्त्यावर कुठेही टाकले जातात. हि बाब राष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभत नसल्याने केंद्र शासनाने प्लास्टिकरहित राष्ट्राद्वाज वापरण्यास बंदी घातली आहे.