नाशिक (प्रतिनिधी) : दरवर्षीहोणारा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग रथोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. याबाबत मागच्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा झाली होती. अखेर हा रथोत्सव रद्द करण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग रथोत्सवाला परवानगी मिळावी यासाठी भाविक न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. सध्याचा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता हा रथोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने सांगितले. त्यानंतर या भाविकांनी रात्रीतून मुंबई गाठून उच्च न्यायालयात रिपीटीशन दाखल केली. मात्र उच्च न्यायालायातसुद्धा केवळ नाराजीच या भाविकांच्या पदरी पडली. त्यामुळे अखेर यावर्षीचा त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग रथोत्सव रद्द करण्यात आला आहे.