म्हसरूळ परिसरातील वाईन शॉपमध्ये चोरी….

नाशिक (प्रतिनिधी) : म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोड येथील समृद्धी अपार्टमेंट मधील गाळा नंबर-२ मध्ये असलेल्या दिंडोरी लिकर्स वाईन शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने या वाईन शॉपचे लोखंडी ग्रील आणि शटर तोडून वाईन शॉप मध्ये प्रवेश केला. काउंटर मध्ये ठेवलेली एकूण ९५ हजार रोख रक्कम या चोरट्याने चोरून नेली. त्यामुळे या वाईन शॉपचे मालक किशोर ठाकरे यांनी अज्ञात इसमांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भडीकर हे या प्रकरणात पुढील तपस करत आहेत.