मोलकारणीनेच लांबवले लग्नघरातील दागिने

नाशिक (प्रतिनिधी): लग्नघरात मोलकारणीनेच दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना मायको सर्कल येथे घडली आहे. लग्नघरात हळद उतरविण्याचा कार्यक्रम सुरु होता. यात सगळे मग्न असल्याचा गैरफायदा या मोलकरणीने घेतला. मायको सर्कल येथील नयनतारा अपार्टमेंट येथे हा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी या घरकाम करणाऱ्या महिलेने कपाटातील तब्बल चार लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

सुनिता नेहरे असे या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.