मोबाईल परत मिळविण्यासाठी 10 हजारांची मागितली खंडणी….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटानजीक राहणाऱ्या युवकाने मोबाईल स्वतःजवळ ठेवून तो मूळ मालकाला परत करण्यासाठी १० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय.

नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या तोहीद खान (वय- १९, रा. पूजा सोसायटी, सिन्नर फाटा, नाशिकरोड) हा शुक्रवारी संध्याकाळी संशयित आरोपी हुसेन शेख (वय-१९, रा. सिन्नर फाटा, नाशिक रोड) याला आपल्या मोटारसायकलवरून सुभाष रोड येथे सोडायला चालले होते. त्यावेळी तोहीद याच्या मोबाईल वर फोन येत असल्याने त्याने हुसेनला खिशातून मोबाईल काढायला सांगितला. सांगितल्याप्रमाणे हुसेन याने तोहीद खान याच्या खिशातून मोबाईल काढला आणि तो स्वतःजवळच ठेवला. तोहीद खान यांनी फोन मागितला असता “फोन पाहिजे असेल तर दहा हजार रूपये आणून दे, नाहीतर फोन विसरून जा.” अशी हुसेनने मागणी केली आणि धमकावले. याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.