मोबाईल खरेदीसाठी दुसऱ्याची कागदपत्रे दिली आणि….

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील सिडको परिसरात मोबाईल खरेदी करण्यासाठी परस्पर दुसऱ्या व्यक्तीची कागदपत्रे देऊन, ५० हजार रुपयांचे प्रकरण मंजूर केले. दरम्यान आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका टोळीवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी इजाज सय्यद व त्याचे मित्र सुयश देवरे, शुभम कातकाडे, अक्षय बागले व महेश गवळी यांनी सुधीर डोमन सिंग (वय ४०,रा. संजीवनगर, अंबड लिंकरोड़) यांनी कर्जमंजुरीसाठी कागदपत्रे, व फोटो दिले होते. तरी सदर टोळीने त्यांच्या जिओ कंपनीच्या नंबरचा वापर करून, त्यांच्या नावावर परस्पर ५० हजारांचे मोबाईल खरेदीसाठी कर्ज मंजूर करून घेतले.