मैत्रिणीच्या भावानेच केला १५ वर्षीय मुलीचा विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी): मैत्रिणीच्या भावाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. संशयित शुभम संतोष करपे(वय१८) आणि कुणाल चौधरी (वय१७ रा. विजय नगर विमानतळ भगुर, नाशिक) या दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अंतर्गत पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मैत्रिणीच्या घरी गेल्यावर हॉलमध्ये बसलेली असताना, तिच्या भावाने (शुभम) अश्लील हावभाव करून जवळीक साधली. व त्याच्या मित्राने(कुणाल) लपून मोबाईलमध्ये शूट केले व चित्रीकरण पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले‌. तसेच आईला शिवीगाळ करून, मुलीला उचलून नेईन असे सांगितले. त्याचप्रमाणे मुलीला धमकीही दिली, तु जर आली नाहीस तर तुझ्या आईवडिलांना जिवे मारून टाकेल. अशी तक्रार नोंद करण्यात आली आहे.