मेस सुरु करत असल्याचे सांगत, २२ हजार घेऊन केली फसवणूक!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील अंबड भागात औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या कामगारांसाठी मेस सुरु करत असल्याचे सांगत, संजय पाटील या संशयित इसमाने करार करून मेसचालकाकडून २२ हजार घेऊन फसवणूक करत पोबारा केला.

प्रभाकर गोपीनाथ बोरखडे (वय ४९, रा .प्रसाद सर्कल, गंगापूररोड) यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अमित ऑटो कंपनीतील कामगारांसाठी मेसचे डबे सुरु करत असल्याचे सांगत संशयित आरोपी संजय पाटील याने फसवणूक केली. कामगारांसाठी मेसचा दाब १०० रुपये दराने सुरू करायचा आहे. त्यासाठी करार करण्यासाठी बोरखडे यांना ८ व १० ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालय येथे बोलावले. करारावेळी बोरखडे यांच्याकडून ९ हजार रुपये घेऊन, त्यांचा साडेतेरा हजार रुपयांचा मोबाईल घेत संशयित्याने मुलास करार करण्यासाठी घेऊन जातो असे सांगत पोबारा केला.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक