मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजनांवर भर देणार – जिल्हा शल्यचिकित्सक

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यू दर अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात ते निम्याने कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि त्याकरिता उपाययोजनांवर अधिक भर दिले जात असल्याचे जिल्हा शल्यचिकीतस्यक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांना यातून बरे करण्यासाठी आणि रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी विविध उपययोजनांवर भर दिला जाणार असून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात  मनुष्यबळ नसल्याने प्राधान्याने डॉकटर्स भरती करण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांना रेमेडिसीव्हीर सारख्या औषधाची आवश्यकता असल्याने ही औषधे रुग्णलयातील रुग्णांना मुबलक दरात उपलबध करण्यासाठी याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा साठा देखील मोठयाप्रमाणात उपलब्ध करण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळेल याची काळजी घेण्यात येणार आहे. बाधितांच्या कक्षात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. रुग्नाची तक्रार व त्यांचे म्हणणे समजून घेऊन पूर्तता करण्यात येणार असल्याचे डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले