मुलीच्या आत्महत्येवर आईने केली तक्रार;तीन संशयितांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाउनच्या काळामध्ये घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. फक्त काही गुन्ह्यांची नोंद होते काहींची होत नाही. साडेपाच महिन्यांपूर्वी एका मुलीचा विवाह झाला होता. माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना लग्नात मानपान न दिल्याने व गर्भपात करावा या कारणासाठी सासरच्यांनी विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे बारागाव पिंप्रीयेथील सासरच्या पाच जणांविरुद्ध मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत महिलेचे नाव उर्मिला रोशन वाणी असून ती २० वर्षांची होती. ७ तारखेला दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर महिलेच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. मुलीच्या आईने सांगितले कि, सासू आणि जाऊ तिला वेगवेगळ्या कारणांवरून  टोमणे मारत असायच्या हे महिलेने माहेरी सांगितले होते असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा नवरा, सासरे व नवऱ्याच्या मोठ्या भावाला अटक केली आहे.